डॉ चिन्मय फडतरे यांनी केला ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेत आधुनिक अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर
  
 आपल्या सर्वांना भारतीय सैन्य दलाने केलेला सर्जिकल स्ट्राईक आठवत असेल ?. हा सर्जिकल स्ट्राईक करताना भारतीय लष्करने ज्या ठिकाणी स्ट्राईक करायचा होता त्या ठिकाणची आधुनिक यंत्रसामग्रीने संपूर्ण माहिती संकलित करून त्या ठिकाणांचे एक्झॅक्ट लोकेशन्स आयडेंटिफाय करून हल्ला केला होता . अशा सर्जिकल स्ट्राईक मुळे गरज असलेल्या भागात कमीत कमी वेळेत मर्यादित स्वरूपाची कारवाई करणे आणि त्यातही इतर सलग्न भागाला इजा न पोहचवने  हाच उद्देश असतो .      
 अलीकडेच साताऱ्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चिन्मय फडतरे यांनी ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेत इन्ट्राऑपरेटिव्ह अल्ट्रा-सोनोग्राफी (IOUS) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करून असाच एक सर्जिकल स्ट्राईक अजिंक्यतारा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी केला आहे . या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेच्या दरम्यान मेंदूतील ट्यूमरचे ( गाठीचे) अचूक स्थान ओळखता आले, ट्यूमरचे अचूकपणे शस्त्रक्रियेद्वारे काढणी झाली आणि रुग्णाच्या मेंदूतील महत्त्वाचे भाग सुरक्षित ठेवता आले.
  
 डॉ. फडतरे यांनी या प्रक्रियेबद्दल माहिती देताना सांगितले, “इन्ट्राऑपरेटिव्ह अल्ट्रासोनोग्राफी म्हणजे शस्त्रक्रियेदरम्यान वापरले जाणारे अल्ट्रासाउंड. हे तंत्र रुग्णाच्या मेंदूचा सखोल अभ्यास करण्यास मदत करते. ट्यूमरचा आढावा घेण्याबरोबरच मेंदूच्या आरोग्यदायी भागांना कोणतीही इजा होणार नाही याची खात्री या तंत्राने करता येते. शस्त्रक्रियेच्या दरम्यान हा तंत्रज्ञानाचा ‘थेट नकाशा’ असल्यासारखा अनुभव आहे.”
  
 ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेतील हा आधुनिक दृष्टिकोन रुग्णांसाठी अधिक सुरक्षित व अचूक उपचार उपलब्ध करून देतो. डॉ. फडतरे त्यांच्या शस्त्रक्रियेमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करत असून, यामुळे रुग्णांचे संपूर्ण आरोग्य सुधारण्याचा मार्ग मोकळा होत आहे. या जटिल शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णाला भूल देण्याची जबाबदारी भूलतज्ञ  डॉ स्नेहा गोडबोले यांनी समर्थपणे पार पाडली . तसेच या अतिजोखमीच्या शस्त्रक्रियेनंतर अजिंक्यातारा हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी सदर रुग्णांच्या संपूर्ण वैद्यकीय व्यवस्थापना मध्ये मोलाची भूमिका बजावली .
  
 रुग्णांनी आधुनिक तंत्रज्ञानामुळे यशस्वी उपचार अनुभवले असून, त्यांना त्यांचे दैनंदिन जीवन पुन्हा सुरू करण्याची संधी मिळत आहे. न्यूरोसर्जरी क्षेत्रात अशा नवकल्पना रुग्णांसाठी नवीन आशेचा किरण ठरत आहेत.
 
या यशा बद्दल डॉ चिन्मय फडतरे यांचे मान्यवर डॉक्टरांनी अभिनंदन केले .या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण अजिंक्यतारा टीम अभिनंदनास पात्र आहे .