?
Ask Question

आज अजिंक्यतारा हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन.....!
आजचा हा सुवर्णक्षण साजरा होत आहे तो केवळ आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळे आणि हे सहकार्य करत असताना आपण जो विश्वास टीम अजिंक्यतारा हॉस्पिटल वर टाकला तो आजवरच्या संस्थेच्या वाटचालीवरून सार्थ ठरत असल्याचे दिसत आहे . हे आपण म्हणू शकतो कारण , पाच वर्ष पूर्ण होत असताना अजिंक्यतारा हॉस्पिटल ने काही माइलस्टोन अचीवमेंट्स प्राप्त केल्या आहेत . त्यापैकी ठळकपणे या ठिकाणी सांगायच्या झाल्यास , तर हॉस्पिटल ने अकरा हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे , तिसऱ्या मजल्याचा विस्तार पूर्ण झाला आहे, आणि संस्थेला एन ए बी एच हे तारांकित मानांकन प्राप्त झालेले आहे .

एकत्र येणे ही सुरुवात , एकमेकांसोबत राहणे ही प्रगती , आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे यश ...
अजिंक्यतारा हॉस्पिटलच्या आजवरच्या या पाच वर्षाच्या रुग्णसेवेच्या प्रवासात वरील तीनही वाक्यांची तंतोतंत प्रचिती येताना दिसते . एकत्र येऊन सुरुवात केली , एकमेकांसोबत राहून प्रगती केली आणि आता एकमेकांसोबत समर्पण आणि समन्वयाने काम करताना अतिशय नम्रपणे टीम अजिंक्यतारा यशस्वी रुग्णसेवा करत आहे .

अजिंक्यतारा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ची संकल्पना त्याच्या अस्तित्वाच्या पहिल्या दिवसापासूनच एक स्वप्न होते . ज्यामध्ये रुग्ण केंद्रस्थानी ठेवण्याचे , सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे आणि समाजाला उत्तरदायी होण्याचे स्वप्न होते . अखेरीस आमच्या रुग्णांच्या आणि त्यांच्या फॅमिली फिजिसियन्स च्या विश्वासामुळेच आरोग्यसेवेची पाच वर्षे यशस्वीपणे पार पडली . जात सर्वोत्तम पायाभूत सुविधा, प्रगत तंत्रज्ञान आणि निष्णात वैद्यकीय मनुष्यबळ या प्रमुख दुव्याचा समावेश होता . यातीलच एक अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणजे आमचे सर्व कन्सल्टंट डॉक्टर्स ज्यांच्याशिवाय ही संकल्पना वास्तवात येणे केवळ अशक्य होते . आमच्या या कन्सल्टंट टीमचे अत्यंत मोलाची साथ , सहकार्य आणि मार्गदर्शन अजिंक्यतारा हॉस्पिटलच्या आजवरच्या प्रवासात लाभलेले आहे .या विशेष सहकार्याबददल आम्ही आमच्या या सर्व सन्माननीय कन्सल्टंट डॉक्टरांना अगदी हृदयापासून धन्यवाद देत आहोत.

मित्रहो जीवन हे एका नदीसारखे निरंतर चालणारी आहे त्यामध्ये काही टप्पे किंवा पडाव येतात . हे पडाव आपल्यामध्ये काही नवीन ऊर्जा नवे संकल्प नवीन ध्येय भरून जातात. आजची घटना ही अशीच आहे . पहिली पाच वर्ष होती ती झाली . आता पुढे नवीन प्रवास आणि आम्हाला खात्री आहे या नवीन पर्वात आपल्या सर्वांची अशीच खंबीर साथ आणि सहकार्य कायम टीम अजिंक्यतारा बरोबर राहील हा विश्वासा बाळगतो. धन्यवाद !!!


Read More-
Stroke Thrombolysis Golden Treatment | Ajinkya Tara Hospital
अजिंक्यतारा हॉस्पिटल मध्ये एकाच वेळी दोन्ही गुडघ्यांवर संपूर्ण गुडघा सांधे रोपण शस्त्रक्रिया यशस्वी.....!

AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer