?
Ask Question

अर्धांगवायूचा झटका ........ सुवर्ण उपचार. सातारा शहराच्या पश्चिमेकडील भाग तसा दुर्गम डोंगराळ आहे . २० जुलै २०२३ च्या रात्री ७:३० वाजता बिभवी या दुर्गम गावातून एक ६० वर्षाची आजी रुग्ण म्हणून अजिंक्यतारा हॉस्पिटल मध्ये दाखल झाली. रुग्णाची संपूर्ण माहिती घेण्यात आली त्यानुसार , आजी त्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत एकदम ठीक होती. साडेपाच च्या दरम्यान आजीला अचानक उलटी आणि चक्कर येण्याचा त्रास सुरु झाला . या जोडीला आजीच डाव्या हातातील आणि पायातील ताकत कमी झाल्यासारखे वाटू लागले, त्याचबरोबर बोलताना अडखळू लागली अशी माहिती नातेवाईकांनी दिली. प्राथमिक तपासणी नंतर हा अर्धांगवायूचा (Paralysis) चा झटका असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली. या शक्यते ची खात्री करण्यासाठी रुग्णाच्या मेंदूची MRI तपासणी ताबडतोब करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पुढच्या अर्ध्या तासात मेंदूची MRI तपासणी करण्यात आली. या MRI रिपोर्ट नुसार आजीच्या मेंदूतील उजव्या भागातील रक्तवाहिनी मध्ये रक्ताची गुठळी तयार झाल्याने मेंदुच्या त्या भागाला शुद्ध रक्ताचा पुरवठा बंद झाला होता . त्यामुळेच आजीला हा सर्व त्रास सुरु झाला होता. वैद्यकीय भाषेत या आजाराला Acute Infract of brain म्हणजेच अर्धांगवायूचा किंवा पक्षघाताचा झटका असे म्हंटले जाते. आजीचे निदान तर झाले आता उपचार ...... !
नवीन संशोधनानुसार पक्षघाता रुग्णांमध्ये जर रुग्णांच्या मेंदु च्या MRI रिपोर्टनुसार रक्तस्त्राव झालेला नसेल आणि जर फक्त रक्तवाहिनीतील रक्ताच्या गुठळीमुळे रक्त पुरवठा खंडित झाला असेल , आणि रुग्ण जर त्याला जाणवणाऱ्या लक्षणांना (Symptoms) सुरवात झाल्यापासून साडेचार (४:३०) तासात रुग्णाचे निदान झाले . तर अशा रुग्णांमध्ये TENECTEPLAS हे इंजेक्शन देवून ती रक्ताची गुठळी विरघळविन्याचे उपचार (STROKE THROMBOLYSIS) करणे शक्य असतात.
आपली आजी सुद्धा या सर्व अटी मध्ये एकदम तंतोतंत बसत होती. या अटी कोणत्या ? तर आजीचे निदान साडेचार तासांच्या आत झालेले होते . दुसरे आजी च्या मेंदुच्या MRI रिपोर्ट नुसार मेंदूमध्ये रक्तस्त्राव झालेला नसून रक्तवाहिनी तील रक्ताच्या गुठळी मुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित झालेला होता . त्यानुसार आजीच्या नातेवाईकांना उपचाराची संपूर्ण कल्पना देण्यात आली आणि त्यांच्या संमतीने आजीला TENECTEPLAS हे इंजेक्शन देण्यात आले (STROKE THROMBOLYSIS). आजीच्या प्रकृतीने या उपचारांना उत्तम प्रतिसाद दिला आणि २४ तासाच्या प्रतिक्षे नंतर आजी बोलू लागली व डावा हात आणि पाय उचलू लागली.
आजीवर वैद्यकीय उपचाराची जवाबदारी अजिंक्यतारा हॉस्पिटल मधील प्रमाणित करण्यात आलेल्या STROKE THROMBOLYSIS विभागातील मुख्य फिजिशियन डॉ संग्राम देशमुख सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने समर्थपणे सांभाळली . येत्या काळात आजी व्यायाम आणि औषध उपचारांनी १००% सुधारणा प्राप्त करेल ......!

धन्यवाद !
टीम अजिंक्यतारा

Read More-
अजिंक्यतारा हॉस्पिटल मध्ये एकाच वेळी दोन्ही गुडघ्यांवर संपूर्ण गुडघा सांधे रोपण शस्त्रक्रिया यशस्वी.....!
अजिंक्यतारा हॉस्पिटल मध्ये रुग्णाच्या पोटातून काढली अडीच किलोची गाठ


AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer