वर्षानुवर्षे दररोज बॉम्बे रेस्टॉरंट ते पोवई नाका आणि परत पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट असा मॉर्निग वॉक करणाऱ्या ८० वर्षाच्या आजीची पावले मागील ६ महिन्या पासून हळूहळू मंदावू लागली . कारण होते ते दोन्ही गुडघ्यांना होणाऱ्या असह्य वेदना . आजीचा नित्यक्रम अगदी परफेक्ट होता त्यामुळे ८० व्या वर्षी सुद्धा फिटनेस एकदम परफेक्ट. ब्लड प्रेशर ची एक गोळी सोडली तर बाकी आँल इज वेल...!
पण या गुडघ्याच्या वेदनांनी जीव अगदी मेटाकुटीला आला होता . किरकोळ वेदनाशामक औषधे घेतले तर तात्पुरते बरे वाटायचे . आजीचे चिरंजीव डॉक्टर असल्यामुळे त्यांनी लगेच अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला असता तज्ञ डॉक्टरांनी आजीच्या दोन्ही गुडघ्यांवर संपूर्ण गुडघा सांधे रोपण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
गुडघा प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये डॉक्टर गुडघ्याचा वेदनादायक सांधा काढून त्या जागी कृत्रिम सांधा बसवतात. गुडघा प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमध्ये मांडीच्या हाडाचे (फिमर बोनचे) टोक बाहेर काढले जाते आणि तेथे मेटल शेलचे प्रत्यारोपण केले जाते. डॉक्टर याबरोबरच खालच्या पायाच्या हाडाचे म्हणजे नडगीचे (टीबीयाचे) टोक सुद्धा काढतात.
दोन महिन्याच्या शोधमोहीम नंतर पुणे येथील प्रसिद्ध जॉईंट रिप्लेसमेंट अस्थिरोग तज्ज्ञ डॉ मनोज तोडकर सर यांनी अजिंक्यतारा हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले . त्यानुसार मागच्या गुरुवारी डॉ मनोज तोडकर सर , त्यांचे सहकारी डॉ सिद्धार्थ हर्डीकर आणि टीमने अत्यंत कौशल्याने आजीच्या दोन्ही गुडघ्यांवर एकाच वेळी संपूर्ण गुडघा सांधे रोपण शस्त्रक्रिया (TOTAL KNEE JOINT REPLACEMENT SURGERY) यशस्वीरित्या पार पाडली . या शस्त्रक्रियेदरम्यान भुलतज्ञ म्हणून डॉ वैशाली मोरे मॅडम यांनी जबाबदारी सांभाळली.
आता शस्त्रक्रिया तर झाली पण रिकव्हरी चे काय? तर रिकव्हरी सुद्धा अस्थिरोग तज्ञ डॉ सत्यजित महादार आणि फिजिओथेरपिस्ट डॉ हर्षद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्तमरित्या सुरू आहे. शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी आजीला दोन्ही पायावर उठून उभे करण्यात आले , तिसऱ्या दिवशी १० ते १५ पावले चालविण्यात आले .
हळू हळू आजीने अशीच प्रगती केली तर लवकरच आजी तिचा वर्षानुवर्षेचा नित्यक्रम म्हणजेच बॉम्बे रेस्टॉरंट ते पोवई नाका आणि परत पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट असा मॉर्निग वॉक पुन्हा नव्याने सुरू करेल , आणि तो ही वेदना विरहित .....! यात अजिबात शंका नाही . कारण आजीची इच्छाशक्ती सुद्धा जबरदस्त आहे....!
या मोठ्या शस्त्रक्रियेसाठी टीम अजिंक्यतारा हॉस्पिटल च्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपले सहकार्य दिले .
धन्यवाद !
टीम अजिंक्यतारा