अजिंक्यतारा हॉस्पिटल मध्ये रुग्णाच्या पोटातून काढली अडीच किलोची गाठ
एका ७५ वर्षांच्या आजीच्या पोटात वारंवार दुखत असल्यामुळे नातेवाईकांनी त्यांची सोनोग्राफी केली असता, सोनोग्राफी रिपोर्ट मध्ये पोटात गाठ असल्याचे निदर्शनास आले. रुग्णांच्या नातेवाईकांनी तात्काळ हॉस्पिटलशी संपर्क साधून रुग्णांस हॉस्पिटल मध्ये दाखल केले. नंतरच्या ३ ते ४ दिवसात रक्ताच्या तपासण्या तसेच पोटाची सी.टी स्कॅन तपासणी करण्यात आली. या सी.टी स्कॅनच्या रिपोर्टनुसार ही गाठ कर्करोगाची असण्याची शक्यता वर्तविण्यात आली कारण गाठ किडणी आणि आतड्याला चिकटली होती. सर्व तपासण्या अंती तात्काळ गाठ काढण्याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय पुणे येथील प्रसिध्द कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. राकेश नेवे आणि जनरल सर्जन डॉ. संजय पाटील यांनी घेतला. या शत्रक्रिये दरम्यान रुग्णांनाला भूल देण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी डॉ. वैशाली मोरे मॅडम यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
सदर शत्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची होती. कारण आतडे, किडनी इत्यादी अवयवांना ही गाठ चिकटलेली होती. ही गाठ किडनीपासून अलगदपणे सोडवून उजव्या बाजूच्या किडनीला कुठलीही इजा न होता वाचविण्यात आली. परंतु या गाठी बरोबर उजव्या बाजूचा मोठ्या आतड्याचा काही भाग काढावा लागला.आजच्या घडीला रुग्णाची प्रकृती उत्तम प्रकारे सुधारत आहे.
ही शत्रक्रिया यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटलच्या सर्व कर्मचार्यांनी आपले सहकार्य दिले.